Meet people, ask them questions! 
कोल्हापूर

लोकांना भेटा, त्यांचे प्रश्‍न विचारा! 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : "कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून "गाव तिथे कॉंग्रेस' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, प्रत्येक गावात पक्षाच्या समित्या नेमण्यात येणार असून, या समितीतील कार्यकर्त्यांनी लोकांना भेटून त्यांचे प्रश्‍न विचारा व ते सोडवण्याचा प्रयत्न करा,' असे आवाहन पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांना केले. 

"गाव तिथे कॉंग्रेस' या उपक्रमाची माहिती देण्यासाठी श्री. पाटील यांनी आज जिल्ह्यातील 12 पैकी 9 तालुक्‍यांतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला आमदार राजू आवळे, ऍड. गुलाबराव घोरपडे, जि. प. सदस्य राहुल पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, कार्यालय चिटणीस संजय पोवार-वाईकर आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील यांनी हातकणंगले, शिरोळ, करवीर, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड व शाहूवाडीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधून उपक्रमाची संकल्पना मांडली. कमिटीत शक्‍यतो पळणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या. या कार्यकर्त्यांनी लोकांना भेटून त्यांची कर्जमाफी झाली का? त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो का? त्यांची कुठे कामे अडली का? असे प्रश्‍न विचारून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. 
तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या पक्षाच्या कार्यालयात याचा आढावा घ्या. या कमिट्या स्थापन करण्यासाठी 20 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. अजून पंधरा दिवस आहेत, या काळात कोणी कोणते काम करायचे, त्याचे वाटप करून घ्या, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

"त्यांचा' अनादर नाही 
पक्षात 30-35 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा आदरच आहे, त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, त्यांचा अनादर करायचा नाही, पण अशा कार्यकर्त्यांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील समितीत स्थान दिले जाईल, गाव पातळीवर मात्र पळणारा कार्यकर्ताच त्या कमिटीत असावा, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली. 

महिलांना सन्मान द्या 
तालुका पातळीवर महिला पक्षाचे काम चांगले करतात, पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची तक्रार आजरा तालुक्‍याच्या महिला अध्यक्षा मीनल एंजल यांनी केली. आम्ही अनेक वर्षे पक्षाचे काम करतो, पण तालुक्‍यात कार्यक्रम असला की आम्हाला निमंत्रणही दिले जात नाही किंवा पद देतानाही विचार होत नाही. त्यामुळे समितीत महिलांनाही संधी द्या, असे सौ. एजंल म्हणाल्या. आपल्या मागणीचा विचार केला जाईल, यापुढे महिला कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊ, असे आश्‍वासन श्री. पाटील यांनी दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

College Student Accident: जिवलग मैत्रिणी रोजचा गाडीवरचा प्रवास, पण आजचा दिवस असा येईल वाटलं नव्हतं... भीषण अपघातात दोघींनाही मृत्यूने गाठले

Thane Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना! ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत सौदा अन्...; बालतस्करीचे भयंकर वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मागील ३ दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा नाही

SCROLL FOR NEXT