meeting of the chamber of commerce monday shop open decision kolhapur marathi news 
कोल्हापूर

चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय : सोमवारी दुकाने सुरू करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांचा निर्णय काहीही हो, कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापना,दुकाने सोमवार (ता.12 )पासून उघडतील, असा निर्णय झाल्याची माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न व्यापारी संघटनांच्या बैठकीत एकमुखी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या सोमवारी दुकाने उघडण्याच्या निर्णयास पाठिंबा ही जाहीर केला. चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात ही बैठक झाली. 

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांची शिखर संस्था आहे. जिल्ह्यातील मोठ्या 55 संघटना सलग्न आहेत. एकूण सुमारे दीडशे छोट्या मोठ्या आणि तालुक्‍यातील संघटना एकत्रित आहेत. आजच्या बैठकीत यातील 44 संघटनांचे पदाधिकारी उपस्थिती होते. गुढीपाडवा हा मोठा सन पुढे आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी कर्ज काढून साहित्य खरेदी केले आहे. गेल्या वर्षभारत लॉकडाऊन मुळे व्यवसाय होऊ शकला नाही. मात्र कर्मचारी पगार आणि इतर खर्च सुरूच राहिले आहेत. तसेच सर्व कर ही भारावे लागत आहेत. त्यामुळे पाडव्याच्या सनाची बाजारापेठ व्यापाऱ्यांसाठी महत्वाची आहे.

गतवर्षीही ऐन पाडव्याच्या मुहुर्तावेळीच लॉकडाऊन केल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. आजही तीच परिस्थिती होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीला मान देवून दोन दिवस दुकाने बंद ठेवली. मात्र आता कोणताही निर्णय होऊ दे, सोमवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचेही शेटे यांनी सांगितले. 

दरम्यान बैठकीत उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा फूटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष व प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव व स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय दुग्गे, ग्रेन मर्चंटस्‌ असोसिएशनचे सचिव व मानद सचिव वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, स्मॅक आयटीआय अध्यक्ष व मानद सचिव राजू पाटील यांनी व्यवसायातील अडचणी सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी संचालक व कन्झूमर प्रॉडक्‍टस्‌ डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन अध्यक्ष प्रशांत शिदे, किराणा भूसार व्यापारी असोसिएशन संचालक राहूल नष्टे, इलेक्‍ट्रीक असोसिएशन अध्यक्ष अजित कोठारी, कापड व्यापारी असोसिएशनचे संपत पाटील, पानपट्टी असोसिएशनचे अरुण सावंत, इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, जिल्हा लॉरी असोसिएशनचे सचिव प्रकाश केसरकर, क्रिडाई सचिव प्रदीप भारमल, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, जोतिबा रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत गोयानी, तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक तौफिक मुल्लाणी, सिमा जोशी, शिवानंद पिसे, धर्मपाल जिरगे व अतुल शहा तसेच सर्व व्यापारी उपस्थित होते.  
संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT