Politics esakal
कोल्हापूर

बँकेची निवडणूक बिनविरोध होणार?

बैठकीत आवाडे व महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पी. एन.-कोरे यांच्यावर सोपवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, याबाबत चर्चा करण्यासाठी आज आमदार विनय कोरे व पी. एन.पाटील हे आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चौघांच्या बैठकीचे ठिकाण निश्‍चित नसले तरी या बैठकीत पतसंस्था गटातील प्रा. जयंत पाटील यांची उमेदवारी चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२६) दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा बँकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, विनय कोरे, खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यात बैठक झाली. बैठकीत आवाडे व महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पी. एन.-कोरे यांच्यावर सोपवली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीच्या आज होणाऱ्या लग्न समारंभासाठी पी. एन. मुंबईत असल्याने ही बैठक आज ठेवली आहे. विकास संस्था गटातील काही तालुक्यातील निवडी बिनविरोध होतील. उर्वरित ९ जागांही बिनविरोध व्हाव्यात हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे. त्यात पतसंस्था व प्रक्रिया गटातील उमेदवारी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. पतसंस्था गटातून सद्या विद्यमान संचालक अनिल पाटील प्रतिनिधीत्त्व करत आहेत. त्यांना डावलून अन्य कोणाला उमेदवारी देण्यास श्री. मुश्रीफ तयार नसल्याचे समजते. दुसरीकडे याच गटातून श्री. कोरे यांनी प्रा. पाटील यांचा आग्रह धरला आहे. प्रा. पाटील यांच्या नावाला पालकमंत्री पाटील यांचाही विरोध शक्य आहे. प्रक्रिया गटातील विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाला श्री. कोरे यांनी विरोध करून प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासाठी आग्रह धरला आहे.

कोरे, अमल यांच्यात चर्चा

उद्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर रात्री आमदार कोरे, माजी आमदार अमल महाडिक यांच्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला प्रा. पाटील हेही उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत प्रा. पाटील हे ‘जनसुराज्य’ चे उमेदवार म्हणून रिंगणात होते, त्यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव झाला. पुन्हा या गटातून त्यांनाच उमेदवारी मिळावी असा श्री. कोरे यांचा आग्रह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT