Meeting of Sakal Maratha Samaj in Kolhapur on Thursday 
कोल्हापूर

 सकल मराठा समाजाची कोल्हापुरात गुरुवारी बैठक 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सकल मराठा समाजाची जिल्ह्यास्तरीय बैठक गुरुवारी धैर्यप्रसाद हॉल येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्व भागातून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक, कायदे अभ्यासक, लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याबरोबरच पोलिस भरती, स्पर्धा परीक्षेतून नोकर भरती, शैक्षणिक प्रवेशातील मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, सारथी संस्थेबाबतचे प्रश्‍न या सारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी वंसत मुळीत म्हणाले, "मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय नोकरीमधील भरती थांबली आहे. विविध शासकीय विभागामध्ये पूर्वी मराठा आरक्षणातून भरती झाली. मात्र स्थगितीचा निर्णय दिल्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. त्यांची नियुक्ती होणे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेची स्वयत्ता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक अशा अनेक प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला कोल्हापूर शहरासह 12 तालुक्‍यातून आणि नगरपालिकांमधून मराठा समाजील विद्वान, ज्येष्ठ मार्गदर्शक, कायदे अभ्यासक सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिींगते सर्व नियम पाळूनच ही बैठक होणार आहे.' 

 या पत्रकार परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ऍड.गुलाबराव पाटील, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, संदिप देसाई, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, महादेव पाटील, शंकरराव शेळके, प्रताप नाईक, अवधूत पाटील, विकास जाधव, ऍड.उदय जाधव, युवराज जाधव, मयुर पाटील, शैलजा भोसले यांची उपस्थिती होती. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT