Meetings of District Co-operative Milk Producers Association GOKUL update marathi news 
कोल्हापूर

गोकुळ सभा सुरु होण्यापूर्वीच कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभा सुरु होण्यापूर्वीच गोकुळ बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. कागल पंचतारांकित एम. आय. डी. सी. परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी १ ला सभा होणार आहे. सभागृहात लावलेले सीसीटीव्ही विरोधकानांवरच लावले आहेत. तसचे सभासद बसतात त्या ठिकाणी पुढच्या रांगेत बसवले आहे. त्यामुळे सभेचे नियोजन करणाऱ्यांना विरोधक धारेवर धरत गोकुळ वादाला सुरुवात झाली आहे.

सत्तारूढ संचालकांकडून गोकुळमध्ये होत असलेल्या कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून समाचार घेतला जात आहे. याला सडेतोड उत्तर सत्तारूढ संचालकांनी दिले आहे. दरम्यान, विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याने संचालकांनीही प्रश्‍नांच्या उत्तरांची तयारी केली आहे. विरोधकांनी गोकुळच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक आक्षपार्ह बाबी निदर्शनास आल्या आहेत, असा आरोप केला आहे.  यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे मात्र जिल्हा दूध संघाची  सभा सुरू होण्यापूर्वीच गोकुळ बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

Latest Marathi Update : नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

SCROLL FOR NEXT