Meghraj Rajebhosale elected as the President of the Film Corporation 
कोल्हापूर

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा मेघराज राजेभोसले यांच्याकडेच आली. मागील सभेत त्यांच्याविरोधात झालेल्या अविश्‍वास ठरावाचे इतिवृत्तच सात विरूध्द सहा मतांनी नामंजूर झाल्याने अध्यक्षपदी पुन्हा श्री. राजेभोसले यांचीच निवड झाली. 


गेल्या 26 नोव्हेंबरला येथे झालेल्या सभेत श्री. राजेभोसले यांच्याविरोधात आठ विरूध्द चार मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर झाला आणि प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड झाली होती. त्यानंतर आज नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी मुंबईत सभा झाली. सभेवेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय होता.

यावेळी श्री. राजेभोसले यांच्यासह खजीनदार संजय ठुबे, शरद चव्हाण, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर यांनी इतिवृत्त मंजुरीला विरोध केला. मागील सभेत अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या महामंडळाचे कार्यवाह, अभिनेता सुशांत शेलार आणि निकिता मोघे यांनीही इतिवृत्त नामंजूर करण्याच्या बाजूनेच मतदान केले. इतिवृत्त कायम करण्यासाठी धनाजी यमकर, पितांबर काळे, रणजीत जाधव, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सतीश रणदिवे, सतीश बिडकर यांनी मतदान केले. 


मागील सभेत घडलेला प्रकार हा नियमबाह्य होता. आजच्या सभेतील मतदानाने ते पुन्हा सिध्द झाले. इतिवृत्तच नामंजूर झाल्याने नवीन पदाधिकारी निवडीचा प्रश्‍नच उरला नाही. आमच्यातील गैरसमज मिटले असून पुन्हा नव्या दमाने महामंडळाचे काम नेटाने पुढे नेवू. 
- मेघराज राजेभोसले

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT