insurance  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पूररेषीतील व्यापाऱ्यांनी ३१ पर्यंत विमा उतरावा; चेंबर ऑफ कॉमर्सचे आवाहन

विमा प्रकरणे थांबवू नका ; चेंबर ऑफ कॉमर्स ने दिले निर्देश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्या व्यापाऱ्यांचे विमे(insurance) संपले असतील त्यांनी नुतनीकरण करुन घ्यावेत, अथवा नवीन करावेत. जर एखादी विमा कंपनी विमा उतरविण्यास इच्छूक नसेल तर त्याची कल्पना द्यावी, असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(kolhapur chamber of commerce and industries) तर्फे सर्व व्यापाऱ्यांना केले आहे. यासंदर्भात आढावा बैठक ३१ जानेवारीला घेण्याचाही निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल पालकमंत्री सतेज पाटील(satej patil) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विमा कंपनी प्रतिनिधी व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व तिच्या संलग्न संघटना प्रतिनीधींची बैठक झाली. यात २०२१ मध्ये आलेल्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांचे ‘क्लेम’ ताबडतोब मंजूर करावे व २०१९ चा महापूर आल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी विमा नुतनीकरण केलेले नाही किंवा विमा उतरण्यासाठी विमा कंपनीने नकार दिला त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. बैठकीत ३१ जानेवारी पर्यंत पूररेषेतील व्यापाऱ्यांनी आपला विमा उतरुन घ्यावा, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरकारी (शासन दरबारी) पंचनामे हवे असल्यास त्यांची नांवे द्या. आम्ही ताबडतोब उपलब्ध करुन देतो. त्यासाठी कोणतीही विमा प्रकरणे थांबवू नका असे निर्देश दिल्याचेही चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्‍ड इंडस्ट्रीजच्या प्रसिद्धी पत्रकातम्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT