merriage stopped; The turnover is down 
कोल्हापूर

लगीनघाई थांबली; उलाढाल घटली... 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च आणि एप्रिलमधील लग्नाचे मुहूर्त वाया गेले. याचा मोठा आर्थिक फटका लग्नाच्या बाजारपेठेशी संबंधित घटकांना बसला. लग्नसोहळा व्यवस्थापन, सराफ, कापड विक्रेते, केटरर्स, हॉटेल आणि कार्यालय व्यावसायिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. या सर्व व्यावसायिकांचे या वर्षी मोठे नुकसान झाले असून आता त्यांची सर्व मदार नोव्हेंबर-डिसेंबरमधील हंगामावर आहे. 
लग्नाबरोबरच रिसेप्शन, मुंज, वाढदिवस यांसारखे सोहळेही मोठ्या थाटात होऊ लागले आहेत. त्यामुळे याची एक स्वतंत्र बाजारपेठ तयार झाली असून हे एक व्यावसायिक क्षेत्रच बनले आहे. लग्नात हॉटेल व्यावसायिकांनाही व्यवसायाची संधी असते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे मार्च-एप्रिलमध्ये सोहळे रद्द झाले. जिल्ह्यातील ही लग्नाची बाजारपेठ कोट्यवधींची असून ती ठप्पच आहे. 

कोल्हापुरातही शाही पद्धतीने लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्नसोहळा व्यवस्थापन व्यवसायावर बरेच छोटे छोटे व्यावसायिक अवलंबून आहेत. मार्च, एप्रिल हे दोन्ही महिने कोणताच सोहळा न झाल्याने या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. 
- केदार जोशी, लग्नसोहळा व्यवस्थापन व्यावसायिक 

भोजन हा लग्नातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच केटरर्स व्यवसाय सुरू झाला. महापुरामुळे श्रावणातील हंगाम गेला, कोरोनामुळे लग्नसराईचा हंगामही गेला. याचा फटका केटरर्सना आहेच; पण वाढपी, आचारी, भांडी घासणारे यांचे हातावरचे पोट आहे. त्यांना आता पुढचे दिवस काढायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- राहुल चौधरी केटरिंग व्यावसायिक. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात मॉब लिंचिंग! मुस्लिम तरूण इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच १०० जण आले; काठी-कोयत्यानं हल्ला अन्... घटनेनं खळबळ

मच्छीमारांना नव्या उत्पन्नाचा मार्ग खुला, रायगड किनारपट्टीवर शैवाल शेती सुरू; प्रशासनाचा नवा उपक्रम

Horoscope : नवा आठवडा, नवी सुरुवात! 16 मार्चचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; अचानक घरी येणार पैसा, ऐकायला मिळेल मोठी बातमी

Latest Marathi Live Update : लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू

5,50,00,00,000 इतकी आहे एकट्या आलियाची संपत्ती, 20 मिनिटाच्या सीनसाठी घेते 9 कोटी तर बिझनेसमधून कमावते पाण्यासारखा पैसा

SCROLL FOR NEXT