meteorological department warned cold wave is expected in northern India in the next two days  
कोल्हापूर

दोन दिवसांत थंडीची लाट: हवामान खात्याने दिला इशारा; कोल्‍हापूरचा पारा १७.१ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. कोल्‍हापूर जिल्ह्यात थंडी वाढली असून पारा १७.१ अंशापर्यंत खाली आला आहे. थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

 जम्मू, काश्‍मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशाच्या बहुतांश भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालचा काही भाग येथे थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात थंडी वाढते. हा थंड वाऱ्यांचा प्रभाव सध्या वाढत असल्याने राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.

राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणीत ७ अंश सेल्सिअस, तर गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 
राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्‍याची थंडी आहे.

किमान तापमान घसरले
राज्यात संध्याकाळनंतर थंडी वाढण्यास सुरुवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच थंडी वाढत आहे. थंडीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर या भागांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

मराठवाड्यातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेच दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात ७ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या भागात किमान तापमान १२ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले. कोकणात बऱ्यापैकी थंडी वाढली आहे. यामुळे या भागात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

SCROLL FOR NEXT