migrated workers love the shivaji maharaj thoughts in kolhapur 
कोल्हापूर

'हम भी शिवाजी महाराज के ऊपर बहोत प्यार करते है,' असं म्हणत 'तो' परप्रांतीय बनारसला रवाना झाला...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शिवछत्रपतींचा लोककल्याणाचा विचार युवकांना सांगण्यासाठी मूळचा बनारसचा (उत्तर प्रदेश) असलेला सुशील यादव आज चक्क शिवराज्याभिषेकाचे पोस्टर घेऊन उत्तर प्रदेशला रवाना झाला. 'हम भी शिवाजी महाराज के ऊपर बहोत प्यार करते है,' असे सांगत त्याने शिवछत्रपतींचे विशाल कार्य मित्रांपर्यंत नक्की पोचवू असा निर्धार केला. त्याचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कौतुक केले.

सुशील उत्तर प्रदेशातल्या बनारसचा आहे. गेली तेरा वर्षे तो कागलमध्ये राहतो. तेथे त्याचे मयूर एस.टी. कॅन्टीन आहे. त्याने कागलमध्ये अनेक मित्र जोडले आहेत. त्यांच्याकडून त्याने शिवछत्रपतींचा इतिहास जाणून घेतला आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमातही त्याचा सहभाग असतो.

कोरोनाच्या संचार बंदीमुळे त्याच्यावर आज बनारसला परतण्याची वेळ आली. मात्र, जाताना तो कोल्हापूरची एक आठवण म्हणून शिवराज्याभिषेकाचे पोस्टर घेऊन रेल्वे स्थानकावर आला. त्याच्या हातातील पोस्टर पाहून प्राचार्य डॉ. नरके यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आवाक झाले. अधिक विचारपूस करता शिवछत्रपतींचा निस्सीम भक्त असल्याचा त्याने खुलासा केला. त्याच्या कॅन्टीनमध्ये पाच मुले काम करतात. त्याचा मित्र विजय जैस्वालही तेथे काम करतो. सुशील म्हणतो, "आम्ही परप्रांतीय असलो तरी कोल्हापूरकरांच्या विचारात शिवछत्रपतींच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. ते आम्हाला कशाचीही कमतरता भासू देत नाहीत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज पाचवा टी२० सामना

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT