Migration suggestions to families in Are 
कोल्हापूर

आरेतील कुटुंबांना स्थलांतच्या सुचना

प्रतिनिधी

हळदी  ः आरे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथे गेल्यावर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी भेट देऊन पूरस्थिती संदर्भात केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 
महापुरामध्ये आरे गावाला फटका बसला होता. गावच्या एका बाजूने तुळशी नदी व दुसऱ्या बाजूने भोगावती नदी वाहते. दोन्हींच्या पाण्याने महापुराचा वेढा दिल्याने बरेच दिवस गावाचा संपर्क तुटला होता. जवळपास 330 कुटुंबांना स्थलांतरित केली होते. लोकांची घरे पडली तसेच काही घरांच्या भिंती पडल्यामुळे भांडी, कपडे, धान्य वाहून गेल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता. या सगळ्या अनुभवाचा विचार करून या वर्षीचा पुराचा संभाव्य धोका ओळखत कुटुंबांना स्थलांतर करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढून महापूरसदृश स्थिती येण्यापूर्वीच कुटुंबांनी स्थलांतरित व्हावे, तसेच शाळा, समाज मंदिरे, खासगी रिकाम्या इमारती या ठिकाणी स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची सोय ग्राम प्रशासनामार्फत करावी, अशा सूचना तहसीलदार यांनी दिल्या. 
करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, मंडल अधिकारी प्रवीण माने, सरपंच साक्षी कुंभार, उपसरपंच मनीषा खराडे, तलाठी नरेंद्र झुंबड, आरोग्य सेवक प्रतीक कुमठेकर, ग्रामसेवक दीपा यादव, कृषी सहायक सतीश वर्मा व ग्रामस्थ उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT