Military officer fraud case Camp police recently took action 
कोल्हापूर

लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल पाच जणींशी केले लग्न; वीरपत्नींना हेरुन पेन्शन मंजूर करतो म्हणत केली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत वीरपत्नींना पेन्शन मंजूर करतो. तसेच आपण अविवाहित असल्याचे सांगत तब्बल पाच विवाह करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंजुनाथ बिरादार (वय ३४, रा. नालवतवाड, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. कॅम्प पोलिसांनी नुकतीच ही कारवाई केली असून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.


वरील संशयिताला गत महिन्यात २१ रोजी मराठा लाईट इन्फंट्री आवारात लष्करी गणवेशात संशयास्पदरित्या फिरताना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीसाठी त्याला कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. मंजुनाथ हा आपण सुभेदार मेजर असल्याचे सांगत लष्करी गणवेशात फिरत होता.

वीरपत्नींना हेरुन वन रॅंक वन पेन्शन मंजूर करतो, असे सांगून फसगत करुन पैसे उकळत होता. तसेच मी अनाथ असून मला लग्न करायचे आहे, असे सांगत विविध गावातील लोकांची भेट घेऊन त्याने आतापर्यंत पाच विवाह करत तरुणींची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात यापूर्वीच बेळगाव, विजापूर, इंडी, रायचूर यासह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. चार दिवसांपूर्वी संशयिताची चौकशी करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT