Gokul Dudh Sangh esakal
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh : अडीच लाख लिटरने वाढले 'गोकुळ'चे दूध संकलन; तब्बल 18 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाकडून दूध खरेदी दराला सर्वाधिक दर दिला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान दरापेक्षा सहा रुपये जादा दर दिला जात आहे.

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाकडून दूध खरेदी दराला सर्वाधिक दर दिला जात आहे. जातिवंत म्हशीसाठी तीस हजारांवरून चाळीस हजार रुपयांचे दिले जाणारे अनुदान आणि गोकुळ (Gokul Dudh Sangh) श्री पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये केल्यामुळे गोकुळकडे दूध संकलन वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोकुळचे दूध संकलन अडीच लाख लिटरने वाढले आहे.

गोकुळने सध्या १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. गोकुळकडून २०२३-२४ मध्ये म्हैस दूध (Buffalo Milk) खरेदीसाठी प्रतिलिटर सरासरी ५८ रुपये ५४ पैसे व गाय दुधासाठी प्रतिलिटर सरासरी ३८ रुपये ३७ पैसे (जादा दर व दरफरक सहित) दर दिला आहे. हा दर राज्यातील सर्वाधिक दर मानला जात आहे. गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान दरापेक्षा सहा रुपये जादा दर दिला जात आहे.

जिल्ह्यात दररोज सुमारे सहा लाख पाच हजार लिटर गायीचे दूध संकलित होते. त्यानुसार दिवसाला ३९ लाख रुपये, तर महिन्याला ११ कोटी ७० लाख रुपये जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिले जात आहेत. याचबरोबर राज्य शासनाकडून पाच रुपये गाय दूध अनुदान दिले जात आहे. गोकुळचा दूध उत्पादक शासनाचे अनुदान म्हणून १४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे अनुदान उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. सभासद हिताच्या राबविलेल्या विविध योजना राबवत उत्पादकांना राज्यातील सर्वाधिक दर देणे शक्य झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT