Gajapur Vishalgad riots Muslim Community esakal
कोल्हापूर

Vishalgad Riots : गजापूर दंगलीप्रकरणी संभाजीराजेंसह हल्लेखोरांवर कडक कारवाई करा; कोल्हापुरात MIM ची निदर्शने

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

''विशाळगड, गजापूर येथे जाळपोळ व घरांवर हल्ले करणाऱ्यांवर ‘यूएपीए’ कायदेंतर्गत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, हल्ल्यातील जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई द्यावी.''

कोल्हापूर : विशाळगड (Vishalgad Riots) व गजापूर गावामध्ये कट रचून प्रार्थनास्थळ व नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, यांसह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद-ऊल -मुस्लिमिन (AIMIM) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरपावसात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी या घटनेस जबाबदार धरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, हिंदुत्ववादी कार्यकर्ते राजेंद्र पडवळ व बंडा साळोखे यांच्यासह हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, यांसह विविध घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. विशाळगड, गजापूर येथे जाळपोळ व घरांवर हल्ले करणाऱ्यांवर ‘यूएपीए’ कायदेंतर्गत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, हल्ल्यातील जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई द्यावी. अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास चार दिवसांनंतर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, शहराध्यक्ष इरफान बिजली, ‘आपला हक्क’ संघटनेचे राहुल कांबळे, इलियास कुन्नूरे, मोहसीन हकीम, सिराज नदाफ, सलमान नाईकवाडे, जुबेर पठाण, जुबेर मंगलेकर, मोशिन जकाते, दिलावर मुल्ला, हैदर शेख, जावेद बारगीर, जमीर नदाफ आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT