Minister Hasan Mushrif Shaktipeeth Highway esakal
कोल्हापूर

Shaktipeeth Highway : कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' महामार्ग रद्द करणारच; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षाकडून या महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू असून, त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ajit Pawar Group) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे ज्या जागेवर आमदार आहेत त्यांना त्या जागा मिळणार आहेत. ज्या पक्षाचा आमदार तेच उमेदवारीचे दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी ज्यांचे निवडून येण्याचे मेरिट आहे, त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणतीही विसंगती नसून निवडणुकीच्या तोंडावर चर्चा या होतच राहणार, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत ‘शक्तिपीठ’ महामार्ग रद्दच केला जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी हा संवाद साधला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्षाकडून या महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू असून, त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु मंत्री या नात्याने शासकीय पातळीवर जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा महामार्ग रद्द करू.

भाजपच्या चिंतन बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील कागलबाबत काय म्हणाले याबाबत आपल्याला माहीत नाही; परंतु कागलमुळे पराभव झाला, असे म्हटले जात असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा भाव, मराठा आरक्षण अशा विविध प्रश्‍नांमुळे महायुतीला निश्‍चितच मतदान कमी झाले.’

कोल्हापूरचा विजय लोकशाहीमुळे, मग हातकणंगलेचा पराभव धनशक्तीमुळे कसा?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विजय हा धनशक्तीमुळे झाल्याचा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये विजय मिळवल्यानंतर तो लोकांमुळे झाला असे असेल, तर मग हातकणंगलेमध्ये पराभव झाला तो धनशक्तीमुळे कसा? निवडणुका झाल्यावर निवडून आलेल्या उमेदवारावर धनशक्तीचा आरोप हे विरोधकांकडून होतात. ती लोकशाहीत रुढ झालेली पद्धत आहे.’

मग उत्तरप्रदेशमध्ये अजित पवार गेले होते काय?

‘आरएसएस’च्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे महायुतीला कमी मते मिळाल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘याबाबत कालच मंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे. जर महाराष्ट्रात अजित पवार यांच्यामुळे जागा कमी झाल्या असतील तर मग ते उत्तर प्रदेशमध्ये गेले नव्हते. तेथेही जागा कमी झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकंदरीत देशात जी परिस्थिती झाली आहे ती मान्य करून विधानसभेत आपण दुरुस्ती केली पाहिजे.’

छगन भुजबळ नाराज नाहीत

मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची पक्षाला गरज लागणार आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेत जाऊ नये, अशी विनंती केल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला आहे. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थितीही लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT