minister hasan mushrif emotional appeal to private doctors 
कोल्हापूर

'खासगी डॉक्टरांनो नुसत्या नोटाच छापू नका, माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा!'

सकाळ वृत्तसेवा

कागल : खासगी डॉक्टरांनी कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नये. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवावा, कोरोनाबाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करावी, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन आणि खासगी डॉक्टर, डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ करण्यात आला. तसेच कोरोनातून बरे झालेल्या कागल मधील हिंदुराव पसारे (वय-75) व त्यांच्या पत्नी सौ सुलोचना पसारे (वय-70)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.   

मंत्री मुश्रीफ म्हणाले, या पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले आणि एकमेव कोविड हॉस्पिटल आहे. 112 बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व व्हेंटीलेटरचीही सुविधा अत्यल्प दरात दिल्या जाणार आहेत.

ते म्हणाले, 'माझं कुटुंब -माझी जबाबदारी' हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. 12 ते 24 ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि 25 ऑक्टोबरला कोरोनारुपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया, असे ते म्हणाले.

आढावा बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूड सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. विद्या जाधव, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य निरीक्षक अभिजीत गोरे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, ॲड. संग्राम गुरव आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सौरभ पाटील यांनी आभार मानले. 

 हातात हात घालून काम करूया.....

विरोधक समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: शेवटी ते बापाचं काळीज! भारतातून कॅनडाला गेलेल्या वडिलांनी लेकं अन् नातीला दिलं भावनिक सरप्राइज

Mumbai : आमदार निवासातील कँटिन चालकाला दणका, अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई

Pune News : खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

Guru Purnima 2025: ज्यांनी केवळ अभिनयच नाही, आयुष्यही शिकवलं; कलाकारांच्या गुरूविषयी आठवणी

Satara News : कराड हादरलं! अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; जन्मदात्यांचीच 'तिला' जीवे मारण्याची धमकी..

SCROLL FOR NEXT