Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

'कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्नं बघणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा'; हसन मुश्रीफांचा कोणावर रोख?

Minister Hasan Mushrif : ‘गेली ३५-४० वर्षे अव्याहत माझी जनसेवा सुरू असते. संपूर्ण आयुष्यात कधीच गट-तट, जात -धर्म पाहिला नाही.'

सकाळ डिजिटल टीम

हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थांनी वैयक्तिक सत्कार आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सत्कार यांच्या माध्यमातून प्रचंड गर्दी केली होती.

मुंबई : एका बाजूला संपूर्ण आयुष्य जनतेसाठी खर्ची घालणारा मी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय हव्यासापोटी विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगात घालण्याची स्वप्ने बघणारी दुष्ट प्रवृत्ती, अशी ही लढाई आहे. या सगळ्यांचा विचार आणि तुलना तुम्हीच करा आणि अशा दुष्ट प्रवृत्तीला हद्दपार करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

मुंबईत आयोजित कागल मतदारसंघातील (Kagal Constituency) ग्रामस्थांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मुंबईकर ग्रामस्थांच्यावतीने पांडुरंग शेट्टी, अरुण पाटील, अमृत साळोखे, दत्तात्रय जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

मुश्रीफ म्हणाले, ‘गेली ३५-४० वर्षे अव्याहत माझी जनसेवा सुरू असते. संपूर्ण आयुष्यात कधीच गट-तट, जात -धर्म पाहिला नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय स्वार्थापोटी विरोधकांना तुरुंगात घालणारी षड्‍यंत्री प्रवृत्ती. तसेच निराधारांच्या योजनेची चौकशी लावून गोरगरिबांच्या संसारात पाणी ओतणारी वृत्ती, बांधकाम कामगारांच्या नोंदण्या बंद करणारा, एमआयडीसीतील कंपन्या बंद पडणारा, दूध संघ विकून मोडून टाकणारा, मागासवर्गीयांच्या जमिनी काढून घेणारा, अशा दुष्ट प्रवृत्तींशी ही लढाई आहे.’

यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे यांची भाषणे झाली. मेळाव्याला केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, वसंतराव धुरे, सतीश पाटील, शशिकांत खोत, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, कृष्णात मेटील, सूर्यकांत पाटील, सौ. शीतल फराकटे, काशिनाथ तेली, डी. एम. चौगुले, अंकुश पाटील, शिरीष देसाई, दीपक देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

हार-फुलांचा ढीग

हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थांनी वैयक्तिक सत्कार आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सत्कार यांच्या माध्यमातून प्रचंड गर्दी केली होती. मेळाव्याच्या ठिकाणी अक्षरशः फुले, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ यांचा ढग पडला होता. पाच हजारांहून अधिक मुंबईकर ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे मुश्रीफही भारावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT