minister jayant patil tweet on maharashtra vikas aghadi government completes 
कोल्हापूर

सरकार टिकणार नाही अशी टिव-टिव करणाऱ्यांना जयंत पाटलांचा टोला

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेला आज एक वर्षे पूर्ण झाले. सत्ताधारी याचा आनंद साजरा करत आहेत तर विरोधक एक वर्षात सरकारकडून काय चुकलं हे सांगत आहेत. अनेक नेत्यांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करत एक जुना फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मंत्री पाटील यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लगावला आहे. 

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी एकत्र येत मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले होते. तोच फोटो मंत्री जयंत पाटील यांनी शेअर केला आहे. 'आम्ही आलेलो आहोत..आमचा रस्ता मोकळा करा !' असे खुले आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला त्यावेळी दिले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील त्याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील या ठिकाणी भाजपवर टीका केली होती. 'सत्यमेव जयते असलं पाहीजे सत्तामेव जयते आपण होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते. आम्ही केवळ ५ वर्षांसाठी आलो नाहीत तर ५ चा पाढा म्हणण्यास आलो आहोत असा विश्वासही त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने त्यावेळी व्यक्त केला होता. त्याच क्षणाचा फोटो मंत्री पाटील यांनी आज आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासून भाजपमधील काही नेते हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही अशी वक्तव्य करत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायन राणे यांनी तर अनेक वेळा हे सरकार किती दिवसात पडेल याच्या तारखाच दिल्या होत्या. परंतु, अनेक अडचणींचा सामना करत सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. याचाच आनंद व्यक्त करत मंत्री पाटील यांनी एक फोटो शेअर केला आहे. 'हे राज्य टिकावे ही तर श्रींची इच्छा' असे कॅप्शन या फोटोला दिले असून यातून सरकार टिकणार नाही अशी टिव-टिव करणाऱ्यांना टोला लगावला असल्याची चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त होत आहे.

 <

>

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: येरवड्यात भरधाव टेम्पोचा थरार! फुटपाथवर घुसून अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

कार नाल्यात कोसळली, तो वाचवा वाचवा ओरडत होता; वडिलांच्या डोळ्यादेखत २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाचा बुडून मृत्यू

HDFC ग्राहकांसाठी रेड अलर्ट! जर 'ही' 1 चूक कराल तर डायरेक्ट बँक अकाऊंट होईल रिकामं; आजवरच्या सर्वांत मोठ्या फ्रॉडबद्दल दिली माहिती

Latest Marathi Live Update : शिवतीर्थावरील शिवपुतळा उंचावणार; १९ फेब्रुवारीला शिवजयंतीदिनी भूमिपूजन

Bike Trip: बाइक ट्रिप कुठे करावी अन् कुठे नाही? प्रवास करण्यापूर्वी 'या' टिप्स ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT