कोल्हापूर

आजरा कारखाना पुढील हंगामात सुरू करणार : मुश्रीफ

रणजित कालेकर

आजरा : आजरा साखर कारखाना पुढील हंगामात सुरू करण्यावर भर राहील. यंदा विलंब झाल्याने कारखाना सुरू करण्यास मदत करता आली नाही, पण पुढील वर्षी कारखाना सुरु करणार असल्याची ग्वाही सभासदांना देत असल्याचे वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिली. 

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ""यंदा उसाचे पीक चांगले आहे, पण कोरोनामुळे टोळ्या मिळणे कारखाना प्रशासनाला अडचणीचे झाले आहे. अधिक पैसे देउन टोळ्यांची पळवा-पळवी होणार आहे. त्यामुळे कारखानदारी समोर अडचणी वाढल्या आहेत.'' 

थकीत कर्जापोटी आजरा कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला आहे. बॅंकेने कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पुण्यातील एका पार्टीने निविदा भरली होती, पण ती पार्टी सक्षम नसल्याने बॅंकेने विचार केला नाही. कारखान्याला राज्यशासनाची थकहमी मिळावी. जिल्हा बॅंकेने त्यासाठी सहकार्य करावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते.

संचालकांबरोबर कामगारांची धडपड सुरू होती. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. त्यांनीही या प्रश्‍नात लक्ष घातले होते. कारखान्याचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असल्याने व राज्यात महाआघाडी सरकार असल्याने कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती, पण जिल्हा बॅंकेने कर्ज देण्यात तांत्रिक अडचणी सांगितल्याने स्वबळावर कारखाना सुरू झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकासमंत्री व बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर तालुक्‍यात चर्चा सुरू झाली आहे. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT