Minister of State for Home Affairs Shambhuraj Shri Jyotiba temple meet 
कोल्हापूर

जोतिबाच्या दर्शनासाठी गृहराज्यमंत्री आले पण मंदिराच्या दारातूनच परत गेले

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : गृराज्यमंत्री शंभुराज देसाई हे आज श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जागर सोहळा असल्यामुळे दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी आले पण कोरोना संसर्गामुळे १५ मार्च पासून मंदिर बंद असल्यामुळे त्यांनी दरवाजातूनच जोतिबा  देवाचे मुखदर्शन घेऊन ते  मंदिराच्या दारातूनच माघारी परतले .


 मंत्री श्री देसाई हे दर वर्षी तीन चार वेळा दर्शनासाठी येतात. त्यांचा कुलस्वामी जोतिबा आहे. ते जोतिबा देवाची निस्सिम भक्त आहेत. त्यांनी आज पर्यंतच्या इतिहासात चैत्र यात्रा कधीच चुकविलेली नाही. आज सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजीराव सांगळे देवस्थानचे अधिक्षक महादेव दिंडे तसेच  ग्रामस्थ पुजारी यांनी मंत्री देसाई यांचे स्वागत केले .


श्री देसाई हे ही आज पुजारी वर्गात मिसळले. त्यांच्या घराण्याचे स्वतःचे पुजारी यांची ही त्यांनी आपुलकीने चौकशी करून अडीअडचणी समजून घेतली. जोतिबा गावात पोलीस ठाणे मंजूर आहे . पण कर्मचारी नाहीत . या बाबात उपसरपंच सांगळे यांनी देसाई यांच्याशी चर्चा केली . देसाई यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .अगदी साधेपणाने वागणारे जनमानसात मिसळणारे मंत्री देसाई यांची डोंगरावर आज चर्चा रंगली.त्याच्या आजोबा  कै.बाळासाहेब देसाई यांचे जोतिबा डोंगरावर मोठे योगदान आहे . त्यानी डोंगरावर अनेक विकास कामे केली आहेत . मंदिरात च्या मंडपात त्यांचा फोटो आज ही आहे.
संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT