A minor girl was sexually assaulted at Vishalgad by threatening 
कोल्हापूर

धमकी देऊन विशाळगडावर अल्पवयीन  मुलीवर केले लैगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

आंबा (कोल्हापूर) ः  विशाळगडावर अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. दोघा संशयितांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिस भाऊद्दीन डेलेकर (वय 24) व लियाकत रहीम मुजावर (25, दोघेही रा. विशाळगड) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांना 26 में पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पीडित मुलीला सीपीआरकडे पाठविले. मुलीच्या आईने शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (बेघर वसाहत) व संशयित विशाळगडावर राहतात. पीडित अकरा वर्षीय मुलगी रविवारी दुपारी मैत्रिणीसोबत एका घरासमोर खेळत होती. या वेळी संशयित डेलेकरने पीडित मुलीला "लियाकत भैय्याने तुला शेळ्या चारायला बोलावले आहे, असे सांगून विशाळगड येथील उंबराचा झरा परिसरात नेले. या वेळी मैत्रिणीला गोड बोलून घटनास्थळावरून घरी पाठवून दिल्यानंतर डेलेकर व मुजावर याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घडलेल्या घटनेची वाच्यता केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही मुलीला दिली.

दरम्यान, बराच वेळ मुलगी घरी न आल्याने सायंकाळी आई-वडिलांनी शोध घेतला असता मुलगी उंबराचा झरा शेतवडीच्या बाजूने येताना दिसली. घाबरलेल्या अवस्थेतील पीडित मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. पोलीस उपअधीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले, सपोनि भालचंद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT