missing boy was found eight hours later pattankodoli kolhapur 
कोल्हापूर

 बेपत्ता मुलगा आठ तासांनी सापडला आणि आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला    

सकाळ वृत्तसेवा

हुपरी - सायकलिंगला जातो म्हणून सकाळी घरा बाहेर पडलेलला पट्टण कोडोली येथील शाळकरी मुलगा बेपत्ता झाल्याने परिसरात घबराट उडाली. मात्र, हुपरी पोलिस आणि नागरिकांनी सतर्कतेने उघडलेल्या शोध मोहिमेमुळे तो अवघ्या आठ तासांत सुरक्षितपणे आढळून आला. मुलगा सुखरुप आढळून आल्याने आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. विनायक प्रमोद बोरगावे (वय12 रा.पट्टण कोडोली) असे त्या मुलाचे नाव आहे. 

विनायक बोरगावे हा पट्टण कोडोली मधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकत आहे. त्याला सायकलिंग तसेच पाळीव श्वानांची आवड आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास तो नेहमी प्रमाणे सायकलिंगसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारचे बारा वाजले तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याची मित्र परिवार तसेच इतरांकडे चौकशी सुरू झाली. पण माहिती मिळाली नाही. 

दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गांभीर्याने दखल घेत तपासाची सुत्रे तातडीने हलवली. सीसीटीव्हीचे ठिकठिकाणचे फुटेज तपासून पोलिसांसह स्थानिक तरुणांची स्वतंत्र पथके तयार करून विनायकचा शोध जारी केला. 

दरम्यान, विनायक पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर, पल्लवी यादव व कर्मचारी, पालक आदींनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. मनसेचे कार्यकर्ते रविंद्र आडके, संदीप फगरे आदींनीही शोधमोहिमेत सहभाग घेतला. अधिक विचारपूस करून पोलिसांनी त्यास आई वडिलांच्या हवाली केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT