MLA Awadesaheb do not contaminate politics 
कोल्हापूर

आमदार आवाडेसाहेब राजकारण दूषित करू नका

पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे आहे. कोरोना काळात आयजीएम रुग्णालयात आवश्‍यक सुविधांसाठी तिन्ही मंत्र्यांनी प्रयत्न केले. वास्तविक स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकण्याचा आमदार आवाडे यांचा प्रकार निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त झाली. 
राष्ट्रवादीचे मदन कारंडे, कॉंग्रेसचे शशांक बावचकर व शिवसेनेचे महादेव गौड यांनी भूमिका व्यक्त करतांना आमदार आवाडे यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. नगरसेवक राहुल खंजिरे, रवींद्र माने, प्रकाश पाटील उपस्थित होते.

श्री. कारंडे म्हणाले, ""इचलकरंजीच्या प्रश्‍नावर पालकमंत्री सतेज पाटील नेहमीच प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 15 वेळा आयजीएम रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा देण्याचे काम त्यांनी केले. आयजीएमकडील 42 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असतांना त्यांचे नुकसान आमदार आवाडे यांनी केले आहे. हा प्रश्‍न निकालात काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'' 

श्री. बावचकर म्हणाले, ""तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी आयजीएमसंदर्भातील कांही कामे प्रस्तावित केली होती. त्या कामांना निधी देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे. सर्व मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे आमदार आवाडे यांचे सांगणे चुकीचे आहे. 42 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न हातात घेऊन वैद्यकीय अधीक्षक आर. आर. शेटे यांच्या बदलीचा त्यांचा प्रयत्न होता. आयजीएम सक्षम करण्यास आघाडी सरकार बांधील आहे. केवळ राजकारण दूषित करण्याचा प्रकार ते करीत आहेत.'' 

श्री. गौड म्हणाले, ""केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आमदार आवाडे धडपडत आहेत. तत्कालीन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयजीएम रुग्णालयाला मदतीची भूमिका घेतली आहे. आतापर्यंत शासनाने रुग्णालयाला मदत केली आहे. स्वतःहून आवाडे यांनी कांहीही दिलेले नाही. खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातूनही विविध सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न असतांना केवळ महाविकास आघाडीची बदनामी करण्याचे काम आमदार आवाडे करीत आहेत.''

संपादन ः रंगराव हिर्डेकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महाराष्ट्र डेटा सेंटर हबच्या तयारीत! विकास प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल! आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होणार, तिकिटाचे दरही वाढणार; प्रवाशांच्या खिशाला फटका

Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णाईच्या लेकी मालिकेत स्टार प्रवाहची अभिनेत्री मुख्य भूमिकेत, जाणून घ्या संपूर्ण कास्ट आणि प्रसारणाची वेळ

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

SCROLL FOR NEXT