kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापूर - आमदार चंद्रकांत जाधव यांची अंत्ययात्रा 3 वाजता

धक्काबसला पालकमंत्री सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तरचे आमदार उद्योजक आणि फुटबॉलपटू चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant jadhav) यांचे मध्यरात्री हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी एक पर्यंत कोल्हापुरात पोहोचणार असून दोन वाजेपर्यंत काँग्रेस (congress) समितीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काशीद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. (kolhapur)

दरम्यान, कोल्हापुरात त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. दुपारी १.०० ते १.३० पर्यंत काँग्रेस कमिटीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारी १.३० ते ३.०० वाजेपर्यंत पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. ती कोल्हापूर उद्यम सोसायटी, जाधव आयर्न वर्क्स, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठेत येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.

कोविड (covid -19) नंतर त्यांच्या अन्ननलिके आणि हृदयाकडी ल रक्त वाहिनी ला इन्फेक्शन झाले होते. काही महिन्यापूर्वी मुंबईत छोटी शस्त्रक्रिया ही झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी आठवड्याभरापूर्वी त्यांना हैदराबाद मध्ये दाखल केले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र पुन्हा इन्फेक्शन झाल्याने दोन दिवसापूर्वी आणखी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

जॉस बटलर निवृत्ती घेणार? T20 World Cup मधील खराब कामगिरीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, 'जसं असेल, तसं...'

धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT