MLA P N Patil resigns to bhogavati sugar factory 
कोल्हापूर

गळीत हंगाम समारंभानंतर आमदार पी. एन. पाटील यांचा अधक्षपदाचा राजीनामा

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक - आजच भोगावती सहकारी साखर कारखान्याचा 63 वा गळीत हंगाम उत्साहात सुरू झाला असतानाच गळीत हंगाम समारंभ संपल्यानंतर लगेच कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी राजीनामा दिला. यामुळे भोगावती कार्यक्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्री. पाटील यांनी राजीनामा दिला असला तरी संचालक मंडळाकडून तो अद्याप मंजूर केलेला नाही. संचालक मंडळ तेच अध्यक्षपदावर राहतील या भूमिकेवर ठाम आहेत.

आज सकाळी दहा वाजता कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचाच्या शुभारंभासाठी श्री. पाटील आपल्या दोन पुत्रांसह उपस्थित होते. यावेळी कुणालाही पुसटशी शंकाही राजीनाम्याची आली नव्हती. कार्यक्रमही नेहमी प्रमाणे संपन्न झाला. त्यानंतर श्री. पाटील यांनी सभागृहात प्रधान कार्यालयात जाऊन अत्यंत गुप्त बैठक घेतली. यामध्ये कोणताही अधिकारी, कर्मचारी यांना प्रवेश दिला नव्हता. फक्त संचालक मंडळाची बैठक घेऊन आपला राजीनामा स्पष्ट गेला.  यावेळी काही काळ अत्यंत स्तब्धता राहिली. कुणालाही याबद्दल कल्पना नव्हती. पुन्हा संचालकांनी याबाबत आमदार श्री. पाटील यांच्यावर दबाव टाकून राजीनामा आम्ही घेणार नाही अशी भूमिका घेतली. तब्बल दोन तास चर्चा झाली. परंतु श्री. पाटील कोणतीही भूमिका स्पष्ट न करता कोल्हापूर कडे रवाना झाले.


याबाबत आमदार श्री. पाटील यांना विचारले असता "भोगावतीच्या सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मी कारखाना अत्यंत काटकसरीने चालवला. लागेल तितकी मदत साखर कारखान्याला केली. कामगार व सभासदांचा हितचिंतकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मी खुर्ची अडवणारा माणूस नाही. आजवर अनेकांना या खुर्चीवर मी बसवले. केवळ सभासदांचे आणि कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्षे भोगावती चा कारभार माझ्या छत्रछायेखाली झाला. आता आमदारकी व अन्य कारणामुळे पुरेसा वेळ देता येत नाही हेही तितकेच सत्य आहे. शिवाय खुर्ची अडवून बसू नये या भूमिकेमुळे मी हा राजीनामा दिला आहे. तरीही पूर्वीसारखीच माझी मदत असेल."असे सांगितले. 

   
असे जरी असले तरी त्यांचा आमदारकीचा व्याप, करवीर मतदारसंघासाठी अपुरा पडणारा वेळ, मुंबईचे दौरे' राजीवजी सुतगिरण, दादा बँकेच्या व्यापातून हवा तितका वेळ कारखान्याला देता येत नाही हेही कारण आता पुढे येत आहे. दुसरीकडे त्यांच्या पश्चात अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.


एकीकडे कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ मोठ्या थाटामाटात होतो. अध्यक्षांचे भाषण होते आणि काही मिनिटातच राजीनामा देऊन अध्यक्ष निघून जातात हा मोठा धक्का कामगारांसह उपस्थितांना आज बसला. श्री. पाटील यांच्या राजीनाम्याचे नेमके हे कारण असू शकते काय की आणखी काय कारण आहे. याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT