Prakash Awade Mahendra Pandit esakal
कोल्हापूर

Prakash Awade : 'पोलिस ठाण्यात गुंडांना सौजन्याने खुर्ची मिळते'; आमदार आवाडेंनी अधीक्षकांसमोरच काढले वाभाडे

पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना नीट वागणूक मिळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

'गांजा, चरसचे प्रमाण वाढले आहे. याची साखळी तोडून काढण्यासाठी पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत.'

इचलकरंजी : ‘शहरात औद्योगिक शांतता बिघडली असून ती जपण्यासाठी पोलिसांचे पाठबळ कमी पडत आहे. वाढलेल्या गुंडगिरीबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. गुंडांच्या याद्याही दिल्या आहेत. त्या मिळाल्या नसल्या तर पुन्हा पुन्हा याद्या देतो. पोलिस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना नीट वागणूक मिळत नाही. मात्र, गुंडांना सौजन्याने खुर्ची मिळते, ’ अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांच्यासमोरच केली.

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरुवातीपासून सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवले. त्यामुळे ही बैठक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर असली तरी चर्चा शहरातील गुन्हेगारीवर झाली.

आमदार आवाडे (MLA Prakash Awade) म्हणाले, ‘कोल्हापुरातील पोलिसांकडून इचलकरंजी शहरात येऊन सातत्याने कारवाई केली जाते. एकाच क्लबवर तीन तीन वेळा कारवाई होते. मात्र स्थानिक पोलिस शांतच आहेत. शहराच्यादृष्टीने ही मोठी खंत आहे. यामुळे शहरात गुंडगिरी वाढत असून शहर शांत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आता पोलिसांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. सर्वसामान्य नागरिकांना काही त्रास होत असेल तर तक्रार करा. तक्रार कोणी घेत नसतील तर माझ्याकडे या. मी कोणाला सोडणार नाही.’

यानंतर गुन्हेगारीच्या सर्व मुद्द्यांना दुजोरा देत बोलताना पोलिस अधीक्षक पंडित म्हणाले,‘गांजा, चरसचे प्रमाण वाढले आहे. याची साखळी तोडून काढण्यासाठी पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत. शहरातील गुंडांवर तीन तीनवेळा मोका कारवाई करूनही ते गंभीर गुन्हे करत आहेत. यापुढे शास्त्रोक्त तपास करून अशा समाजकंटकांची जागा कायमस्वरूपी जेलमध्येच ठेवली जाईल.’

साहेब ..गांजा, चरस रोखा

इचलकरंजी शहरात गांजा, चरसबाबत सुरू असणारी चर्चा आज जिल्हा पोलिस अधीक्षकांपुढेही उमटली. गांजा कुठून येतो, कसा पुरवठा होतो, यासह लोकेशनबाबत माहिती आम्ही देत असतो. या व्यसनाच्या आहारी तरुणाई मोठ्या प्रमाणात जात असून साहेब, शहरात येणारा गांजा, चरस रोखा, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT