MLA Rajesh Patil said, Funding For Chandgad Due To Mahavikas Aghadi Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

महाविकास आघाडीमुळे "चंदगड'ला निधी ः आमदार राजेश पाटील

अशोक पाटील

कोवाड : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी चंदगड विधानसभा मतदार संघाला निधीची कमतरता भासणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यामुळे साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न मार्गी लागल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. 

येथील ताम्रपर्णी नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकराव देसाई होते. कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्या स्मिता माने उपस्थित होत्या. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन आणल्याबद्दल शेतकऱ्यांतर्फे आमदार पाटील यांचा देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला. 

आमदार पाटील म्हणाले, ""अनेक बंधाऱ्यांचे बांधकाम जीर्ण होऊन पडझड सुरू झाली होती. त्यातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होती. पाणी गळतीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी लागणार असल्याचे सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला. टप्प्याटप्याने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.'' 

या वेळी उपविभागीय अधिकारी तुषार पवार, शाखा अभियंता पी. एम. अर्जूनवाडकर, ठेकेदार परेश पोकळे, माजी उपसरपंच विष्णू आडाव, श्रीकांत पाटील, एस. एल. पाटील, विनोद पाटील, राहूल देसाई, बंडू चिगरे, म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील, किणीचे सरपंच संदिप बिर्जे, आप्पा जाधव, चंद्रकांत सुतार, सुवर्णा पाटील, सुवर्णा कुंभार, नुसरत मुल्ला, कृष्णा बिर्जे, शंकर पाटील, रविंद्र देसाई, मारुती बाळेकुंद्री, सुर्यकांत पाटील, चंद्रकांत कुभांर उपस्थित होते. रामा व्हन्याळकर यांनी सुत्रसंचालन केले. तानाजी आडाव यांनी आभार मानले. 

गळती बंद होईल
अलिकडे बंधाऱ्यांवरुन जड मालाची वाहतूकही सुरु झाल्याने बंधाऱ्यांच्या कमानींचे दगड निखळत होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यातील पाणी गळती पूर्णता बंद होणार आहे. 
- स्मिता माने, कार्यकारी अभियंत्या 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT