Rohit Pawar esakal
कोल्हापूर

Rohit Pawar : 'महाराष्ट्राच्या राजकारणात 50 आकड्याला फार महत्त्‍व'; असं का म्हणाले आमदार रोहित पवार?

Kolhapur Politics : राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातचा विचार करणारे सरकार आहे’, असा आरोप आमदार पवार यांनी यावेळी केला.

सकाळ डिजिटल टीम

मंत्री मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यासह त्यांच्या घराण्यावर केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांच्यावर बोलताना मुश्रीफ यांनी जरा सांभाळून बोलण्याची गरज आहे.

इचलकरंजी : ‘राज्यातील महायुतीचे सरकार (Mahayuti Government) हे ‘जाऊदे’ म्हणजेच जाहिराती, उधारी व दलालीवर चालणारे सरकार आहे. गेल्या दहा दिवसांत जाहिरातींवर साडेपाचशे रुपये खर्च केले आहेत. या सरकारने ४० ते ५० हजार कोटी रुपये उधारी राज्यावर करून ठेवली आहे. हे एजंटगिरीचे सरकार असून, त्यांनी ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या सरकारला येत्या काळात हद्दपार करा’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.

येथील जवाहरनगरमधील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या ५० फुटी रावण दहन कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, राहुल खंजिरे, सागर चाळके, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंह पाटील, सुहास जांभळे, आदी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, ‘या ठिकाणी ५० फुटी रावण आपण दहन करीत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणांमध्ये ५० या आकड्याला फार महत्त्‍व आहे. तो भ्रष्टाचाराचे प्रतीक झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या निमित्ताने सर्वांनी भ्रष्टाचाररूपी रावण दहन केला पाहिजे. समाजात विष पेरले जात आहे. द्वेष निर्माण केला जातोय. समाजासमाजात वाद निर्माण केला जातोय. अशा प्रकारचा रावण यापुढे दहन करायचा आहे. महागाई, भ्रष्टाचाराचा रावण आपणास जाळायचा आहे.’

गुजरातचा विचार करणारे सरकार

‘राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातचा विचार करणारे सरकार आहे’, असा आरोप आमदार पवार यांनी यावेळी केला. ‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कॉटनचे कापड महाराष्ट्रातील इचलकरंजीसारख्या वस्रोद्योग केंद्रातून खरेदी करावे, अशी आमची मागणी होती. मात्र, या सरकारने गणवेशासाठी आपला विचार न करता गुजरातवरून कॉटनचे कापड आणले’, असेही ते म्हणाले.

मंत्री मुश्रीफांचे वक्तव्य दुर्दैवी

‘मंत्री मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यासह त्यांच्या घराण्यावर केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांच्यावर बोलताना मुश्रीफ यांनी जरा सांभाळून बोलण्याची गरज आहे. त्यांच्या मतदारसंघातील स्वाभिमानी मतदार आगामी निवडणुकीत लोकशाही मार्गाने योग्य असे उत्तर मुश्रीफ यांना देतील’, अशी प्रतिक्रिया पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: दसरा मेळाव्याआधी राधाकृष्ण विखे पाटलांनी फोन का केला? संपूर्ण किस्सा सांगत मनोज जरांगेंनी समाजावर नवे काम सोपवले

Shubman Gill: दिसतो तसा नाही! अभिषेक शर्माने केली मित्राची पोलखोल; म्हणाला, 'त्याच्यामुळे आम्ही निलंबित झालो होतो...'

Video : डॉक्टरांचा निर्दयीपणा! हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला नकार; विव्हळत फरशीवरच दिला बाळाला जन्म, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

SCROLL FOR NEXT