MLA Ruturaj Patil Appeal to teachers meet kolhapur
MLA Ruturaj Patil Appeal to teachers meet kolhapur 
कोल्हापूर

पदवीधरच्या प्रश्नांची उकल करण्याची ताकद अरुण लाड यांच्याकडेच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  ‘‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्षांची एकत्रित ताकद मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व ‘पदवीधर’चे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाची वाट सुकर झाली आहे. तरीही गाफिल न राहता उरलेल्या दिवसात जोमाने प्रयत्न करा. मतदानादिवशी शंभर टक्के मतदान होईल याची दक्षता घ्या व या दोन्ही उमेदवाराना विजयी करा,’’ असे आवाहन कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.


फुलेवाडी रिंग रोड येथील शिक्षक व पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले,‘प्रा. आसगावकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यास मोठा आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नाची जाण असल्यामुळे ते शिक्षण विषयक व शिक्षकांचे प्रश्न ताकदीने मांडतील. ‘पदवीधर’चे उमेदवार अरुण लाड यांना ही शैक्षणिक क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे. पदवीधरच्या प्रश्नांची उकल करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे पदवीधर मतदारानी आपला प्रतिनिधी म्हणून श्री लाड यांना निवडावे.’’
या वेळी सौ. अनु जयंत आसगावकर म्हणाल्या, ‘‘आसगावकर परिवाराने बहुजनाच्या शिक्षणासाठी जे योगदान दिले आहे, शैक्षणिक आव्हाने परतवून लावण्यासाठी जो संघर्ष केला आहे याची नोंद घेऊन प्रा. आसगावकर यांना मतदान करून निवडून आणावे.’’ 


या वेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, वसंतराव देशमुख, प्रा. महादेव नरके व श्री. उदय पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. किरण पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सविता पाटील, एन. के. चव्हाण, बाजीराव कांबळे, अर्जुन पाटील, डी. डी. पाटील, अमित रजपूत, प्रशांत पोतदार, राजेंद्र तोंदकर, संतराम कांबळे, शिवाजी पाटील, वैशाली पाटील, शारदा पाटील, अनुराधा वणकुंद्रे आदी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT