mobile theft in kolhapur st stand 
कोल्हापूर

कोल्हापूर ; लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला लुटले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - तरुणाला मारहाण करून त्याच्या खिशातील रोकडसह मोबाईल संच लुटून नेणाऱ्या दोघा लुटारूंचा अवघ्या तासाभरात शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून लुटीतील साडेसहाशेची रोकडसह मोबाईल संच जप्त केली. सचिन गोरख जाधव (वय 25, रा. रिंगरोड आयोध्या कॉलनी) आणि संग्राम अनिल खामकर (वय 22, रा. टाकाळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राम परवेज कुमार (वय 24, मूळ रा. झारखंड सध्या रा. गांधीनगर) हा मजुरी करतो. मध्यरात्री तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लघुशंकेसाठी उभा होता. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या मोपेडवरून 20 ते 25 वयोगटातील दोघे लुटारू त्याच्याजवळ आले. त्या दोघांनी कुमारला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील 650 रुपयाची रोकड व मोबाईल संच असा एकूण 18 हजार 650 रूपयाचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर ते दोघे मोपेडवरून पसार झाले. हा प्रकार कुमार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात येऊन सांगितला. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार प्रकाश भंडारेसह सागर माने, दिग्विजय चौगले, कृष्णात पोवार, प्रथमेश पाटील यांच्या पथकाने लुटारूंचा शोध सुरू केला. ताराराणी चौक परिसरात एक लुटारू मोपेडवरून उतरून बागेत जाऊन लपून बसला. हे पथकाच्या लक्षात आले. पथकाने त्याला ताब्यात घेतला. 

दरम्यान, काही वेळाने त्याचा एक साथिदार पुन्हा मोपेड घेऊन तेथे साथिदाराला नेण्यासाठी आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनी आपली नावे सचिन जाधव, संग्राम खामकर असल्याचे सांगितले. त्या दोघांकडून लुटून नेलेला मुद्देमाल जप्त केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT