Molecular hydrogen formation research by dr supriya patil kolhapur 
कोल्हापूर

पाणीटंचाई आणि ऊर्जानिर्मितीचा कमी खर्चात नवा पर्याय शोधला कोल्हापूरच्या कन्येने

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : जगभरात विविध कारणांमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहीर केलेल्या अंदाजाप्रमाणे २०२५ मध्ये एक अब्ज लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या १८.१३ टेरावॅट इतकी ऊर्जा जगभरात वापरली जाते. २०४०  पर्यंत याचे  प्रमाण २४ ते २६ टेरावॅट पर्यंत पोचेल. 

पाणीटंचाई आणि ऊर्जानिर्मितीचा नवा पर्याय समोर आणावा लागेल. हाच विचार करून कोल्हापुरातील डॉ. सुप्रिया पाटील हिने वेगवेगळे नॅनोपार्टिकल वापरून मॉलिक्‍युलर हायड्रोजन (एच २) निर्माण करू शकतो, हे दाखविले आहे.  त्यांच्या या संशोधनात त्यांनी प्लॅटिनमऐवजी इतर धातूचा वापर केल्याने ही प्रक्रिया कमी खर्चिक आणि सोपी बनली आहे, हे दाखविले.

डॉ. सुप्रिया पाटील या मुळच्या कागल तालुक्‍यातील हसुर खुर्दच्या. त्यांनी पदवीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात केले. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना त्यांना एकलव्य, मल्होत्रा फांऊडेशनच्या स्कॉलरशीप मिळाल्या. त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियातील हनयांग विद्यापीठात पी. एचडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तेथे ‘इनऑरगॅनिक नॅनोमटेरिअल्स फॉर सोलर सेल’ या विषयातून डॉक्‍टरेट संपादन केली.

त्यांच्या पीएचडीचा प्रबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिंकामधून प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतरही त्यांनी पोस्टडॉक्‍टरल संशोधन सुरू ठेवले आहे. त्यानंतर त्या दोनंगुंक विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. तेथे त्यांनी ‘सिंथेसिस ऑफ १ डी नॅनोस्टरक्‍चर अँण्ड मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क फॉर सस्टेनेबल हायड्रोजन प्रोडक्‍शन’ या विषयात संशोधन सुरू केले आहे. सध्या त्या दक्षिण कोरियातील सेजोंग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

कोरियातील मराठी लोकांसाठीही पुढाकार
डॉ. सुप्रिया पाटील या संशोधनाबरोबर दक्षिण कोरियात सामाजिक कार्यातही सहभाग घेतात. सध्या त्या दक्षिण कोरियातील मराठी मंडळ, कोरिया या समितीच्या सदस्याही आहेत. या समितीमार्फत त्या कोरियातील मराठी लोकांसाठी कार्य करतात.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT