mom killed child crime case in sangli 
कोल्हापूर

हृदयद्रावक : बाळाचा त्रास बघवत नसल्याने आईनेच पोटच्या गोळ्याला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

सकाळ वृत्तसेवा

भिलवडी (सांगली) : माळवाडी (ता. पलूस) येथे जन्मदात्या मातेनेच आपल्या १३ दिवसांच्या नवजात बालकास पाण्यात बुडवून मारले. ऐश्वर्या अमितकुमार माळी (वय २२, रा. कवलापूर, ता. मिरज) असे त्या आईचे नाव आहे.

 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

 माळवाडी-वसगडे रस्त्यावरील पाटील मळ्यानजीक उत्तम धोंडिराम माळी यांचा साईदीप बंगला आहे. ते शेती करतात. त्यांची मुलगी ऐश्वर्या यांचे नात्यातील मुलाशी लग्न झाले. त्यांना पहिला मुलगा आहे. सांगलीतील खासगी दवाखान्यात दुसरे बाळंतपण झाले. जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी या बाळावर शस्त्रक्रिया झाली. तरीही बाळाला त्रास सुरूच होता. पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता. बाळास होणारा त्रास न पहावल्याने मातेनेच हे अघोरी कृत्य केल्याचे तपासात रात्री उघड झाले. 


आज सकाळी घरातील सर्व मंडळी शेतात कामासाठी गेली होती. ऐश्वर्याची आई व वहिनी घराजवळच धुणे धूत होत्या. ऐश्वर्या घरात एकटीच होती. तिने सकाळी साडेनऊ वाजता बाळास दुसऱ्या मजल्यावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवले. त्यात बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. खाली येऊन बाळ गायब झाल्याचा कांगावा केला. बंगल्याचे पाठीमागील दरवाजा उघडा ठेवला. यामुळे नातेवाईक व शेजारी गोळा झाले. 


भिलवडी ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी पंचनामा केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी झाली. तासगावच्या पोलिस उपाधीक्षक अश्‍विनी शेंडगे यांनी घटनास्थळावर येऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान ऐश्‍वर्या हिनेच पोटच्या गोळ्याला बुडवून मारल्याचे निष्पन्न झाले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: न्यूझीलंड मालिकेआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी! ऋषभ पंतला दुखापत; अचानक मैदान सोडावं लागलं, काय घडलं?

Jalgaon Municipal Election : जळगावची रणधुमाळी! प्रभाग ८ मध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने; कोण मारणार बाजी?

GT vs UPW WPL 2026: गुजरात जायंट्सची सर्वोच्च धावसंख्या, यूपी वॉरियर्सवर दणदणीत विजय; Point Table मध्ये RCB ला धक्का

Priyanka Damle: बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले बिनविरोध; शिवसेना शिंदे गट विरोधकाची भूमिका बजावणार

Nashik News : नाशिकमध्ये गुटखा व तंबाखू उत्पादकांवर एफडीएचा घाव; सुमारे ९.७१ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त!

SCROLL FOR NEXT