Ghataprabha River esakal
कोल्हापूर

Monsoon Rain : घटप्रभा, ताम्रपर्णीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; दोन्ही नद्यांवरील 12 बंधारे पाण्याखाली

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Monsoon Rain) कोसळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

फाटकवाडी व जांबरे या दोन्ही प्रकल्पांतून वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंदगड : तालुक्याच्या पश्चिम भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Monsoon Rain) कोसळत असून घटप्रभा (Ghataprabha River) व ताम्रपर्णी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. घटप्रभेवरील पिळणी, भोगोली, गवसे, हिंडगाव, कानडी, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, आसगाव, कुर्तनवाडी व हल्लारवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

फाटकवाडी व जांबरे या दोन्ही प्रकल्पांतून वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले दोन दिवस पश्चिम भागात घटप्रभा व ताम्रपर्णी नदी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असले तरी सलगपणा नसल्यामुळे पूरस्थिती फारशी गंभीर नसली तरी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे.

फाटकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वीज निर्मितीसाठी ९०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी क्षेत्रात कोसळणारा पाऊस व प्रकल्पातून सोडलेले पाणी यामुळे पाणी पातळी वाढून बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर जांबरे प्रकल्पातून २३० क्युसेकने वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरू असल्याने या नदीच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसला तरी जुलैच्‍या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगली सलामी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT