More than 25 per cent of Ichalkarji's corona is infected 
कोल्हापूर

इचलकरजीचा 25 टक्‍क्‍याहून अधिक भाग कोरोना बाधीत 

संजय खूळ

इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अघोषित संपूर्ण लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली आह. नागरिकांनीही स्वतःहून काही निर्बंध घालून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

शहरातील रुग्णांची संख्या गेली 14 दिवस सातत्याने वाढत आहे. दोन आठवडे वाढत जाणारा हा संसर्ग धोक्‍याच्या पातळीवर येऊन ठेपला आहे. काही विशिष्ट भागात असणारा कोरोना आता शहरातील विविध भागात पसरू लागला आहे. कुडचे मळा पासून गाव भागापर्यंत जवळपास 25 टक्‍क्‍यांहून अधिक भाग आता संसर्ग बाधित झाला आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी भाग सील करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या पातळीवर विविध प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने अजून कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. 

सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी ज्या गोष्टीचे पालन करणे आवश्‍यक असताना नागरिकांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे सध्याचे चित्र आहे. ही परिस्थिती आटोक्‍यात आली नाहीतर पुढील काळात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः दक्ष राहण्याची गरज आहे. शहराची एकूण लोकसंख्या आणि नागरी वस्तीतील दाटीवाटी पाहता हा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. भाग लॉक केले असले तरी अंतर्गत ज्या पद्धतीने नागरिकांचा वावर आहे, तो धोकादायक ठरण्याची भीती आहे. 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष... 
शहरालगतच्या ग्रामीण भागात आता शहरातील संसर्गाचा मोठा धसका घेतला आहे. त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मार्फत कडक निर्बंध लावले जात आहेत. शहरांमध्ये मात्र अशा पद्धतीने निर्बंध घालण्यासाठी लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा पुढे येत आहे. एकूणच परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी सांगड घालून शहरातील वाढता प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

दृष्टिक्षेप 
- इचलकरंजीत संपूर्ण लॉकडाउनसारखी स्थिती 
- 14 दिवसांत सातत्याने रूग्णांमध्ये वाढ 
- 15 हून अधिक ठिकाणचे भाग सील 
- 25 टक्‍क्‍याहून अधिक भाग संसर्ग बाधित 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT