more corona patient death in top kolhapur district 
कोल्हापूर

टोपमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मुत्यू ; नागरिकांच्यात भितीचे सावट..

युवराज पाटील

टोप (कोल्हापूर) : येथील ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा काल रात्री उशिरा मृत्यु झाला. यामुळे खळबळ उडाली असून, नागरिकांच्यात भितीचे सावट आहे.


कोरोनाबाधीत डॉक्टरच्या संपर्कातील महिला आजारी पडली होती. काही दिवसापूर्वी या महिलेने प्रकृती बिघडल्याने गावातीलच एका डॉक्टरकडून तपासणी करून घेतली होती. त्यानंतर त्यांना अधिकच अत्यावस्थ वाटू लागले. ही महिला मयत झाल्याची अफवा पसरली व तीला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.  या महिलेला सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. शनिवारी (१८)  त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

दरम्यान, उपचारादरम्यान या महिलेचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांच्यात प्रचंड घबराट पसरली आहे. त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे.नागरिकांनी घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत, दक्षता समिती आणि आरोग्य विभागाने केले आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT