more corona patient found in kolhapur stir among the citizens 
कोल्हापूर

गावात खळबळ : टोपमधिल एकाला कोरोनाची लागण...

सकाळ वृत्तसेवा

टोप  (कोल्हापूर) : येथील एका ४५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, टोपमधील कोरोना बाधीतांचा आकडा तीन वर पोचला आहे. त्यामुळे नागरिकांच्यात खळबळ उडाली.


ट्रान्स्पोर्ट व्यावसायीक व डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कातील कालच काही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला होता. पण आज सकाळी एका ४५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली. ही महिला पहिल्यापासूनच आजारी असल्याने काही दिवसापुर्वी गावातील एका मध्यवस्तीतील असणाऱ्या एका डाँक्टरकडे तपासणी केल्याचे असल्याचे समजेते. तसेच ५ तारखेला रक्षा विर्सजण कार्यक्रमास भुये येथे गेल्या होत्या.

त्यांनी बावडा येथील लाईन बझार येथेही तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना अधिकच अत्यवस्थ वाटु लागल्याने येथुन त्यांना काही दिवसापुर्वीच सिपिआर ला दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा स्वँब घेण्यात आला. आज शनिवार सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे गावात पुन्हा भितिचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी मोठी असल्याचे समजते. त्याची माहिती घेण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT