more eleven corona positive patient in kolhapur district  
कोल्हापूर

मोठी बातमी - कोल्हापुरकरांची चिंता वाढली ;आणखी तीस जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाला थोपविण्यात पहिल्यांदा यशस्वी ठरलेल्या जिल्हावासियांसाठी गेले चाैदा दिवस रोज नवीन धक्के बसत आहेत. काल दिवसभरात ३४ नव्या रूग्णांची भर पडल्यांतर आता एकदम तीस नव्या रूग्णांची भर पडल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारचा (पाच रूग्ण) दिवस सोडला तर जिल्ह्यात रोज चाळीसच्या पुढे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. हे सर्वच रूग्ण मुंबई, पुणे, सोलापूर भागातून जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आलेले आहेत. कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त होत असून काल दिवसभरात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या सर्वांनी प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शाहूवाडीतील सर्वाधिक १४ जण आहेत. अन्य तीन तालुक्‍यातील प्रत्येकी एक ते दोन आहेत. अजूनही दीड हजारांवर स्वॅबचे परीक्षण येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यातही बाहेरून आलेल्या व्यक्तीच अधिक आहेत. 

या  तीस रूग्णंसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या  आता ४६६ वर पोहोचली आहे. 

आता आलेल्या अहवालातील गडहिंग्लज नऊ, चंदगड सहा, शाहुवाडी चार, राधानगरी पाच, कागल दोन, शिरोळ दोन आणि आजऱ्यातील दोघांचा समावेश असून सहा वर्षाच्या एका मुलासह पाच वर्षाच्या एका मुलीचाही समावेश आहे. 

हे पण वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT