more one corona positive patient found in kolhapur ichalkaranji
more one corona positive patient found in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

इचलकरंजीला आणखी एक  झटका ; एकाच कुटुंबातील चार जण झाले पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी- शहरात आज सांयकाळी आणखी एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळला. डेक्कन सूतगिरणी मागे असलेल्या दत्तनगर परिसरातील गल्ली क्रमांक 10 मधील 55 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोनाबाधीत झाले आहेत. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


सोलापूरहून आलेल्या दोन सूनांसह नातीला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या वृध्दाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा वृध्द अल्फोन्सा स्कूल येथे विलगीकरण कक्षात होता. त्याला रात्री सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.


सोलापूरहून आलेल्या व कृष्णानगर आणि राऊत मळा येथे राहणार्‍या दोन महिलांसह त्यांच्या आठ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आठ नातेवाईकांसह 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 8 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले होते. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.

उर्वरीत चार नातेवाईकांच्या अहवालाची प्रतिक्षा होती. त्यापैकी 55 वर्षीय वृध्दाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांयकाळी स्पष्ट झाले. त्यामुळे या कुटुंबातील कोरोना संसर्गबाधीत संख्या 4 वर तर शहरातील संख्या सातवर पोहचली आहे. यातील दोघे कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

दोन सूनांसह नातीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या या वृध्दासह आठजणांना चार दिवसांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. तत्पूर्वी, हा वृध्द अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे दत्तनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT