more two death coronavirus patient in top kolhapur district 
कोल्हापूर

टोपमध्ये कोरोनाचा दुसरा बळी : आज आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू...

युवराज पाटील

टोप (कोल्हापूर) : येथील कोरोना बाधीत ७३ वर्षीय वृध्दाचा आज सकाळी मृत्यु झाला. टोपमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे, तर सकाळीच एका ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दररोज वाढणारी रुग्णांची संख्या आणि दुसरा बळी यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.


मृत व्यक्तीने काही दिवसापुर्वी गावात एका डाँक्टरांकडे दोन वेळा तपासणी केली होती. तर पेठ वडगांव येथील रुग्णालयात ही तपासणी केली होती. त्यानंतर शिरोली आरोग्य केंद्रात गेल्यानंतर, त्यांना कोल्हापूरात सिपीआरला पाठवले होते. १९ जुलैला त्यांचा सिपीआरमध्ये स्वॅब घेतला, तर २० जुलैला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु  होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. 


गावातील कोरोना रुग्णांची संख्या ७ झाली आहे. त्यापैकी दोन मयत आहेत तर दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तीन रुग्ण उपचार घेत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT