Morning and night classes in schools in Kovad area Kolhapur Marathi News
Morning and night classes in schools in Kovad area Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

कोवाड परिसरातील शाळांत सकाळी, रात्री अभ्यासवर्ग

अशोक पाटील

कोवाड : दहावीच्या परीक्षांचा निकाल चांगला लागावा. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी तालुक्‍यात सुमारे 30 हून जास्त माध्यमिक विद्यालयांनी सकाळी व रात्री अभ्यासवर्ग भरविण्यावर भर दिला आहे. मोबाईल आणि टीव्हीमुळेही घरात विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा अभ्यास होत नाही, मात्र परिसरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या अभ्यासिकेमुळे विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

मुलाने दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला की, त्याच्या घरच्यांची काळजी वाढते. जून महिन्यापासूनच पालक मुलांच्या अभ्यासात काही कमी पडणार नाही ना याची दक्षता घेतात. दहावीच्या वर्गात मुलगा शिकत असल्यामुळे पालकही आपल्या कामांचे त्यानुसार वेळापत्रक तयार करतात.

मुलांना सकाळी पहाटे उठवून अभ्यासाला बसविणे, शाळेपर्यंत पोहोचविणे, शिक्षकांशी सतत संपर्क ठेवणे तसेच शाळे व्यतिरिक्त आपल्या मुलाला खासगी क्‍लास देणे. अशा अनेक कामासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यानुसार शिक्षण संस्थाही दहावीच्या वर्गाबाबत काटेकोर नियोजन करतात. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता वाढिण्याचा प्रयत्न सुरू असतो.

अगदी सुट्टीच्या दिवशीही शाळेत विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जातात. पालक मेळाव्यातून शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चर्चा करून पुढील धोरण ठरवत असतात. 3 मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने तालुक्‍यातील बहुतांशी शाळांतून नोव्हेंबर महिन्यापासूनच सकाळी व रात्रीही अभ्यासाचे वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थी अभ्यासात मग्न झाले आहेत. शाळेचा निकाल जास्त लागावा व विद्यार्थ्यांची गुणात्मक प्रगती व्हावी ही उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेवून शाळांनी अभ्यास वर्गांचे आयोजन केले आहे.

सकाळी 7 ते 9 व रात्री 6 ते 9 अशा वेळेत हे वर्ग सुरू आहेत. पालक विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचवतात. व अभ्यास वर्ग संपल्यानंतर परत घेऊन जातात. पालकांचाही याला चांगला प्रतिसाद असल्याने तालुक्‍यातील अनेक शाळांतून हे अभ्यास वर्ग चांगल्या पध्दतीने सुरू आहेत. अभ्यास वर्गांना प्रत्येक दिवशी एका शिक्षकाची नेमणूक केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत फरक पडल्याचे पालकांचे म्हणणे आहे. 

शाळांचा निकाल जास्त लागेल
दहावीचा निकाल चांगला लागण्यासाठी शाळांचे वर्षभर प्रयत्न सुरू असतात. अलिकडे मोबाईल व इंटरनेटचा वापर वाढल्याने त्याचा विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम होत असल्याने अनेक शाळांनी सकाळी व रात्रीच्या सत्रात अभ्यास वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे निश्‍चितच शाळांचा निकाल जास्त लागेल. 
- व्ही. एन. देसाई, मुख्याध्यापक, राजगोळी खुर्द हायस्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT