morning walk shivaji university protest 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात व्यायामासाठी फिरण्याची परवानगी देण्याची मागणी  

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात लॉकडाऊन कालावधीत व्यायामासाठी फिरायला येणार्‍यांना मज्जाव  होता. अद्यापही ही अडवणूक सुरूच आहे.  शुक्रवरपासून (ता.१)  जर विद्यापीठ परिसरात व्यायामासाठी फिरण्यास परवानगी दिली नाही तर विद्यापीठा विरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीतर्फे आज देण्यात आला.

आपल्या मागणीच्या समर्थनार्थ व विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. 'कुलगुरू साहेब नागरिकांचे आरोग्य वाचवा', 'नही चलेगी, नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी' 'विद्यापीठ परिसर फिरायला खुला करा' अशा घोषणा देत कार्यकर्ते हातामध्ये फलक घेऊन उभे होते. यानंतर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना कृती समितीने मागणीचे निवेदन दिले. 

निवेदनातील माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठ परिसरात वर्षानुवर्षे नागरिक सकाळी व संध्याकाळी फिरायला येतात. येथील निसर्गरम्य परिसरात ऑक्सीजनचे प्रमाणही अधिक आहे. त्याचा नागरिकांना लाभ होतो. फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून विद्यापीठाचे कोणतेही नुकसान केले जात नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये फिरण्यास मज्जाव करणे योग्य होते. मात्र आता देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणे सुरू होत असताना फिरायला येणाऱ्या नागरिकांची अडवणूक करणे योग्य नाही. शुक्रवार (ता.१) पासून जर नागरिकांना फिरण्यास मुभा दिली गेली नाही तर विद्यापीठाच्या विरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, चंद्रकांत बराले, श्रीकांत भोसले, भगवान काटे, दुर्गेश लिंग्रस, विनोद डुणुंग, अंजुम देसाई स्वप्निल पोवार प्रवीण बनसोडे महादेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचीच अडवणू का?

विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी सकाळी फिरायला येतात. त्यांना परवानगी दिली जाते. मग नागरिकांना का नाही असा सवालही निवेदनात विचारण्यात आला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

व्हायरल होण्यासाठी काहीही? भारती सिंग सांगितल्या विनोदाच्या मर्यादा, म्हणाली...‘माझी आईसुद्धा पाहणार...’

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Petrol-Diesel: कच्चे तेल महागल्याने पाकिस्तानात 'लॉकडाऊन'चा विचार! भारतात पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय?

SCROLL FOR NEXT