mother and son attend suicide in gadhinglaj in kolhapur 
कोल्हापूर

रात्री नऊ वाजता घरी येवून पाहिलं तर सगळचं संपल होत ; घडलेल्या घटनेमुळे बापानं फोडला हंबरडा

अवधूत पाटील

गडहिंग्लज : येथील घाळीनगरात माय-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली आनंद कोठावळे (वय ४४) व अवधूत आनंद कोठावळे (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी (ता. २२) रात्री ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कोठावळे यांचे मूळ गाव कोगे (ता. करवीर) हे आहे. आनंद कोठावळे येथील पंचायत समितीकडे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी वैशाली व मुलगा अवधूत यांच्यासह घाळीनगरात राहतात.

कोठावळे गेले दोन दिवस घराबाहेर होते. दरम्यान, ते शुक्रवारी (ता.२२) सायंकाळपासून पत्नी व मुलाला फोन करीत होते. पण, त्यावर प्रतिसाद न मिळाल्याने रात्री नऊच्या सुमारास घरी आले. तेव्हा वैशाली व अवधूत यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. येथील पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. आनंद कोठावळे यांनी याबाबतची वर्दी दिली असून हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.

(संपादन - स्नेहल कदम)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT