Crime News sakal
कोल्हापूर

धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन संपवलं जीवन; पतीसह चौघांना अटक

भेंडवडे (ता. भुदरगड) येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत (Mumbai) खोली घेण्यासाठी अवधूत आणि त्याची आई व बाबा, बहीण यांनी काजलच्या माहेरी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

गारगोटी : भेंडवडे (ता. भुदरगड) येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. काजल अवधूत सलते (वय ३२) व मुलगा प्रियांशू (२) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी (Bhudargad Police) आज पती अवधूत (३५), सासरा बळवंत सलते, सासू यशोदा सलते व नणंद शामल दत्तात्रय पाटील (नाधवडे) या चौघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मुगळी येथील काजल हिचा विवाह भेंडवडे येथील अवधूत सलते याच्याबरोबर झाला होता. सध्या त्याचे गावात किराणा मालाचे दुकान आहे. यापूर्वी काही दिवस तो मुंबईत वास्तव्यास होता. यावेळी मुंबईत (Mumbai) खोली घेण्यासाठी अवधूत आणि त्याची आई व बाबा, बहीण यांनी काजलच्या माहेरी दोन लाख रुपयांची मागणी केली होती.

पैशाच्या मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे पती अवधूत व सासू-सासरे आणि नणंद यांच्याकडून काजलचा सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता. या छळाला कंटाळून काजलने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास विहिरीत दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी घेऊन आत्महत्या केली.

काजल हिच्या भावाने काजलचा पती, सासू, सासरे व नणंद यांच्याकडून दोन लाख रुपये पैशाची सतत मागणी केली जात होती. त्याची पूर्तता न केल्यामुळे तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत चौघांना अटक केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के तपास करीत आहेत.

काय घडले?

काजल मुलाला घेऊन सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी घरामागील पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. यानंतर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT