Mother commits suicide after drinking poison with two daughters kolhapur marathi news 
कोल्हापूर

देवा... एक तरी नात ठेवायची होती...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मांगनूर (ता. कागल) येथील विष प्राशन घटनेतील श्रेया गणेश चव्हाण (वय २) हिचा काल (ता. २६) रात्री ‘सीपीआर’मध्ये मृत्यू झाला. मंगळवार (ता. २१)पासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. श्रेयाची आई सारिका गणेश चव्हाण (वय २६) हिने मंगळवारी मानसिक स्थिती बिघडल्याने (ता. २१) श्रेया आणि पायल या दोन मुलींना विष पाजून स्वतःही विष घेतले होते.

आईसह दोन बालिकांचा करुण अंत

यात सारिकाचा बुधवारी (ता. २२) व दोन महिन्यांच्या पायलचा गुरुवारी (ता. २३) मृत्यू झाला. त्यांच्यावर सुरवातीला गारगोटी ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर कोल्हापुरातील ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू होते. दोघींच्या मृत्यूनंतर मोठी मुलगी श्रेयाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती; पण काल तिची प्रकृती वेगाने खालावली आणि मृत्यू झाला. श्रेयाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न अयशस्वी झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

एक तरी नात ठेवायची...

अंगणात बागडणाऱ्या दोन नाती आणि उमद्या सुनेचा मृत्यू झाल्याने आजी-आजोबा दुःखात बुडाले. पायलच्या मृत्यूनंतर श्रेयाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. यामुळे निदान एक तरी नात उर्वरित आयुष्यात साथ देईल, अशी आशा आजी-आजोबांना होती; पण श्रेयाचा मृत्यू झाल्याचे समजताच ‘देवा एक तरी नात ठेवायची होती’ असे म्हणून दोघांनी हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. यामुळे ग्रामस्थ सद्‌गदित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघाला धक्का! २२ वर्षीय खेळाडू पहिल्या तीन T20I सामन्यांतून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Police Bharati Application Website Link : पोलिस भरतीचा अर्ज करा एका क्लिकवर..

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा

बापरे! पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT