Mother in law and daughter in law death due to electric shock in kolhapur 
कोल्हापूर

दुर्दैवी ; विजेच्या धक्क्याने सासू -सुनेचा मृत्यू

राजेश मोरे

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे आज सकाळी विद्युत खांबावर तार तुटल्याने कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू- सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मीना येडेकर (५५) आणि अनुराधा येडेकर (२७) अशी त्यांची नावे आहेत. वारंवार तक्रारी करूनही धोकादायक बनलेल्या खांबावरील विद्युत तारे संदर्भात उपाययोजना न केल्याने ही घटना घडली. 

याबाबत महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे सीपीआरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गडमुडशिंगी येथील गावभागातील आडाच्या बाजूला ओढा आहे. या ओढ्यात दररोज महिला कपडे धुण्यासाठी जातात. आज सकाळी नेहमीप्रमाणे सासू मीना येडेकर या सुन अनुराधा सोबत या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. ओढ्यावरून मोठ्या पोल वरून विद्युत वाहिनी गेली आहे. ही विद्युत वाहिनी अचानक तुटून ओढ्यात पडली. तसा त्या दोघींना विजेचा धक्का बसला. ही घटना परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती महावितरण'ला दिली. त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. पण त्या दोघींचा जागेवरच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेबाबत नातेवाईक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने धोकादायक बनलेली विद्युत वाहिनी आणि खराब झालेला पोल तातडीने बदला. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरण'ने याची दखल घेतली नाही. महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे सीपीआर शवविच्छेदन विभागा जवळ काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

घटनास्थळी गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थ आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट यांच्याशी चर्चा केली. याबाबत महावितरण वर वेळेत गुन्हा दाखल झाला नाही तर दिवाळी दिवशी हुपरी कोल्हापूर रस्ता रोको करणार असा इशारा शिवसेना व ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला दिला. या प्रकरणी वेळेत कारवाई करू असे, आश्वासन भांडवलकर यांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. उपस्थित ग्रामस्थांमध्ये संतोष कांबळे, रावसाहेब पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, रतन कांबळे आदींचा समावेश होता.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Ramdas Athawale: उद्धव ठाकरेंना पक्ष टिकवता आला नाही: राज्यमंत्री रामदास आठवले, महाविकास आघाडीमुळे ही वेळ आली!

SCROLL FOR NEXT