कोल्हापूर

मुलाला आई देणार किडनी,  पण प्रक्रियेचा खर्च आवाक्‍याबाहेर 

प्रकाश नलवडे

कोल्हापूर : मुलगा अठरा वर्षांचा, पॉलिटेक्‍निकच्या दुसऱ्या वर्षात शिकतो, जानेवारीत त्याला ताप आला आणि वैद्यकीय तपासण्या सुरू झाल्या. पुढे त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. अपघात झाल्यामुळे वाहक असलेल्या वडिलांनी एसटी विभागातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. स्वतःच्या आजारासाठी काही पैसे खर्च केले. आता मुलाच्या आजाराने त्यांना धक्का बसला आहे. मुलाच्या उपचारासाठी सात लाख रुपये कोठून उभे करायचे? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. नेतेमंडळींपासून ते मित्र मंडळींपर्यंत, नातेवाईकांपासून दानशूरांपर्यंत सर्वांच्या घराचे उंबरे ते झिजवत आहेत. हतबल झालेल्या बापाच्या आग्रहास्तव आईने मुलाला एक किडनी देण्याचे नियोजन केले आहे. आता गरज आहे ती दानशूरांनी हातभार लावण्याची. 
वसगडे (ता. करवीर) येथील राजेंद्र आण्णा शिंदे असे या बापाचे नाव आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा अठरा वर्षांचा तर मुलगीही त्याच्या बरोबरीचीच. मोटार सायकलीवरून जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांना वाहक म्हणून काम करणे अशक्‍य होत असल्यामुळे त्यांनी शिपाईचे काम करण्यास मिळावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, तेथे नकारघंटा वाजविली. अखेर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. 
ते स्वतःच्या आजारपणातून बाहेर पडत असतानाच मुलगा वृषकेत याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे निदान झाले. 
यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मुलावर आठवड्यातून दोन वेळा डायलेसिस सुरू झाले. सरकारी योजनेचा येथे काही प्रमाणात उपयोग झाला. मात्र, आता त्याची एक किडनी बदलणे आवश्‍यक आहे. आईला सर्व प्रक्रिया समजून सांगितल्यानंतर मुलाला एक किडनी देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. त्याची प्रक्रिया खासगी रुग्णालयात सुरू झाली आहे. 

 
सात लाखांचा खर्च 
रुग्णालयातील शस्त्रक्रिया आणि पहिल्या 14 दिवसांचा खर्च सुमारे सात लाख रुपये आहे. तो पेलणे त्याच्या हाताबाहेर गेले आहे. 
त्यांनी नेतेमंडळीकडे हात पसरले. मात्र, त्यांनी मुंबईला घेऊन जाऊया, तेथे सर्व खर्च करतो, असे सांगितले आहे. मात्र, शिंदे यांना हे शक्‍य नाही. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेनंतर किमान सहा महिने इन्फेक्‍शनपासून त्याला जपणे आवश्‍यक आहे. त्यासाठी स्वतंत्र खोलीत ठेवणे आवश्‍यक आहे. मुलगा इंजिनिअर होणार, याकडे डोळे लावून बसलेल्या या बापावर त्याला जगविण्याची धडपड सुरू झाली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT