Mother's death before sons marriage ceremony in kolhapur 
कोल्हापूर

मुलाच्या लग्नादिवशीच आईचे रक्षाविसर्जन करण्याची आली त्याच्यावर वेळ...

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा - मुलाच्या लग्नाची तयारी गेली पंधरा दिवस सुरू होती. सोमवारपासून घरात देवकार्यालाही प्रारंभ झाला होता.  मुलाला हळदी लागणार होत्या आणि आज तो विवाहबद्ध होणार होता. मात्र, काल अनपेक्षितपणे आई श्रीमती मंगल बाबासो गायकवाड (वय ६५) यांचा रक्तदाब कमी झाला आणि पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. हळदीदिवशीच घडलेल्या या प्रकाराने येथील वेताळे गल्लीतील गायकवाड (यळगावकर) परिवाराचा सारा गोतावळा हळहळला.

सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला

गायकवाड यांना तीन मुली. मुलींसह जावई आणि सारा गोतावळा लगीनघाईत आहे. मुलगा प्रशांतच्या लग्नाच्या निमित्ताने या साऱ्या मंडळींनी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी केली. घराला मंगलतोरण बांधले गेले. मुहूर्तमेढ झाली. मंडप सजून विविध धार्मिक कार्यक्रमांनाही प्रारंभ झाला होता. सनई-चौघड्याच्या सुरांनी सारा माहौल भारलेला असतानाच सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला. नियतीच्या या अनपेक्षित आघाताने उद्या (गुरुवारी) लग्नादिवशीच आता रक्षाविसर्जन करण्याची वेळ या कुटुंबीयांवर आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT