motton market closed in koilhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरकर आता मटण मार्केट राहणार बंद पण.... 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मुख्य मटण मार्केट मध्ये मास विक्री बंद करण्याचा निर्णय खाटीक समाजाने घेतला आहे. या मुळे मटणासह, चिकन आणि मासे विक्री बंद राहणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाच्या धोका लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी दिली. 

हे मुख्य मटण मार्केट जरी बंद राहणार असले तरीही संपूर्ण जिल्ह्यातील मटण, चिकन व मासे विक्री सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  सर्वत्र संचारबंदी असताना देखील कोल्हापूरकरांना मटण खायला मिळत नसल्यामुळे अस्वस्थ झाले होते. महानगरपालिकेने मास विक्रीसाठी परवानगी देताच मास खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे या बंदच्या मुख्य उद्देशालाच तडा गेल्यामुळे मुख्य मटण मार्केट मध्ये मटण, मासे, चिकन विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मटण विक्री वरील बंदी उठल्यानंतर चिकन खरेदीसाठी होम कॉरंटाईन असणाऱ्या तीन व्यक्ती आल्या. शिवाय त्यातील एक व्यक्ती चिकन खरेदीसाठी मार्केटमध्ये गेली तर उर्वरित दोन व्यक्ती मार्केटच्या बाहेर उभ्या होत्या. त्यांनी हातामध्ये ग्लोव्स घातल्याने संशय बळावल्याने त्यांची चौकशी केली असता त्या तिन्ही व्यक्ती होम कॉरंटाईन असल्याचे लक्षात आले. या मुळे खबरदारी म्हणून या परिसरामध्ये असणाऱ्या नागरी वस्तीतली रहिवाशांना धोका होऊ नये म्हणून आगामी काही काळासाठी मुख्य मटण मार्केट बंद ठेवावे अशी विनंती देखील येथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार मुख्य मटण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे विजय कांबळे यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र मटण चिकन व मासे विक्री सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी मटन, चिकन अथवा मासे खरेदीसाठी आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सांगितलेल्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहनही विजय कांबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

SCROLL FOR NEXT