Is the movement going to be avoided by imposing Article 144? 
कोल्हापूर

144 कलम लावून आंदोलन टळणार आहे का

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः मुंबईत सरकारने 144 कलम लावले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कलम लावल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मराठा संघटनांना आंदोलन करता येऊ नये म्हणून हे कलम लावले आहे. अशी कलमे लावून मराठा समाजाच्या भावना दडपता येणार नाहीत. सरकारने कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून यातून कायदेशीर मार्ग काढला पाहिजे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहातील दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, ""मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सरकार मराठा आंदोलकांचा रोष टाळू इच्छित आहे. मराठा संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेताच सरकारने मुंबईत 144 कलम लावले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे कलम लावल्याचे सरकार जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात मराठा आंदोलन दडपण्यासाठीच हे कलम लावण्यात आले आहे. मात्र, अशी कलमे लावून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी कायद्याचा अभ्यास करून कायदेशीर तोडगा काढला पाहिजे. यासाठी सर्वप्रथम मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यात याविषयी चर्चा केली पाहिजे. न्यायालयाची स्थगिती असताना त्या निर्णयाचा अवमान न होता कोणत्या सुविधा मराठा समाजाला देता येतील, यावर विचार झाला पाहिजे.'' 

अजितदादांनी पुढाकार घ्यावा 
चंद्रकांत पाटील म्हणाले, ""अजित पवार हे धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हातात घ्यावा. मराठा आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढावा.'' 

सपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT