MP Dhairyasheel Mane esakal
कोल्हापूर

Dhairyasheel Mane : खासदार मानेंवर मोठी जबाबदारी; शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी करण्यात आली निवड

माने हातकणंगले मतदारसंघातून (Hatkanangle Constituency) सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे सात खासदार निवडून आले असून, शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

कोल्हापूर : लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले.

माने हातकणंगले मतदारसंघातून (Hatkanangle Constituency) सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. नुकतीच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड केली होती.

आता उपनेतेपदी माने यांची निवड केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे सात खासदार निवडून आले असून, शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT